पाठ दुखण्याचे कारण पोट दुखी असू शकते. पाठ वारंवार त्रास देत असल्यास त्याची कारणे खालील असू शकतात.
१. शरीरातील कुठेतरी संक्रमण पाठीच्या आसपास जसे पोटात इत्यादी.(अपचन ॲसिडिटी गॅस )
२. शरीरातील व्हिटॅमिन B, D ची कमतरता.
३. हाडांची घनता कमी झाल्यास वयानुसार
४. बसण्याची चुकीची पद्धत जसे फिरती खुर्चीचा जास्त उपयोग त्यामुळे पाठीत आलेला बाक
५. जास्त वेळ बसून राहणे. अंगाचा स्थूलपणा
आपल्याला हातातील पायातील स्नायुं विषयी माहिती असेल. पण पोटाच्या आतून देखील स्नायूंनी पोट आणि मांडीच्या हाड हे जुळलेले असते. त्या आसपासच्या स्नायूंना आपण खूप कमी जाणतो आणि नेमके त्यांचा कमकुवत पणामुके पाठदुखी होते. आपल्याला पाठ दाबून बघावे लागेल की कुठे दुखत आहे. पाठीच्या वरवर दुखत आहे की आतून दुखत आहे. वर वर दुखण्यासाठी शेक व हलकी मालिश हे उपाय करुन बघावे. कारण मिळाले पण करायचे काय हा प्रश्न आपल्यापुढे येतो. समाधान एकच व्यायाम !! पण कसा कुठला आणि कोणता व्यायाम? तर प्रश्नाचे एकच उत्तर ज्या व्यायामाने पाठ दुखणे कमी होईल. सर्वात आधी जर चालायला त्रास होत नसेल तर चालणे हे सर्वात सोपा व्यायाम. दुसरे उठक बैठक जसे जमेल तसे आणि तेवढ्याच प्रमाणात कारणे. जर इतकं करून आराम मिळत असेल तर पूर्ण आठवडा व्यायाम करावा. जर पाठ शेकवून आराम मिळत असेल तर नक्की पोटाच्या आतील स्नायू अकडली आहेत. त्याकरिता आपल्याला डॉक्टर कडून नीट सांगून औषध घ्यावे लागतील. आणि औषधांसोबत आहार महत्त्वाचा आहे. कारण आपले शरीर पूर्ण औषध शोषून घेऊ शकत नाही. त्याला आहारामार्फत आवश्यक पोषण तत्वे द्यावी लागतात. तसेच व्हिटॅमिन D सोबत तेलकट जेवण करणे आवश्यकच , कारण तरच व्हिटॅमिन D३ चांगल्याप्रकारे शरीरात शोषून घेतल्या जाईल .
सर्वसाधारण कमी प्रमाण आणि मध्यम प्रमाणातील पाठदुखी व्यायाम आणि खाणे बदलामुळे कमी होते. पण जसे प्रत्येकाचे शरीर वेगळे असते त्याप्रमाणे त्यांना आपणहून समजून आहार नी व्यायाम करावा. पोटातील स्नायू पाठीतील स्नायू आणि न दिसणारे पोट नी मांडी जोडणारे आतील स्नायू थोडे मजबूत झाल्यानंतर पाठ दुखणे कमी होऊन आराम मिळतो.
आहारामध्ये
१. तिळ
२. मासे
३.बाजरी किंवा ज्वारी
४. कोबी
५. जवस , मटण, इत्यादी
समावेश करावा लागेल. आणि नियमित व्यायाम व खेळ जसे skating हा पण एक महत्त्वाचा भाग आहे ज्यामुळे पाठ पूर्ण पने बरी होऊ शकते. वरील सर्व उपाय हे मी सर्वांसाठीच लिहिले आहे आणि मी सर्व पाठदुखी तून मुक्त झालो आहे. आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे ट्रेनिंग प्रोग्राम जॉईन करायला.
रितेश वाकोडे